• आम्ही कोण?
  • संपर्क
Saturday, April 4, 2026
  • Login
School of Indian History
  • मुखपृष्ठ
  • भारताचा इतिहास
    • प्रागैतिहासिक भारत
    • प्राचीन भारत
    • मध्ययुगीन भारत
    • ब्रिटिशकालीन भारत
  • इंग्रजी लेख
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • भारताचा इतिहास
    • प्रागैतिहासिक भारत
    • प्राचीन भारत
    • मध्ययुगीन भारत
    • ब्रिटिशकालीन भारत
  • इंग्रजी लेख
  • संपर्क
No Result
View All Result
School of Indian History
No Result
View All Result

सुफीजम – काय खरे काय खोटे?

schoolofindianhistory by schoolofindianhistory
October 19, 2020
in अपरिचित इतिहास, मध्ययुगीन भारत

हिंदूंशी कसे वागावे ? सुफी संत नुरुद्दीन मुबारक गझनवी याचा सुलतान इल्तुतमिश याला उपदेश

‘सुफीझम’ ची क्रेझ आता आपल्याकडे चांगली स्थिरावली आहे. ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’ असे म्हणत, स्वतःभोवती गिरक्या घेणे तरुणाईला ‘हॅपनिंग आणि कूल’ वाटू लागले आहे. भुवया कोरलेल्या, आपल्या बटांशी खेळणाऱ्या काही तोकड्या कपड्यातला नट्या अधिकारवाणीने ‘सुफीझम म्हणजे काय’ यावर व्याख्यानं झोडू लागल्या आहेत, आणि तरुणाई आ वासून wow वगैरे करून त्यांची ही तद्दन भिकार आणि असत्याने भरलेली व्याख्याने ऐकते आहे . पण या सगळ्या ‘यो’ , ‘कूल’ आणि ‘वाव’ लोकांना अस्सल सूफींची एक झलक दाखवावी या उद्देशाने हा लेखन प्रपंच करीत आहे.

सुफी संत नुरुद्दीन मुबारक गझनवी

सैय्यद नुरुद्दीन मुबारक गझनवी हा सूफींमधल्या सुराहवर्दी पंथाचा एक महत्वाचा खलिफा होता. त्याच्या जन्मानंतर त्याच्या वडिलांनी त्याला ख्वाजा मुहम्मद अजल शिराझी या सुफी संताच्या दर्शनाला नेले. सूफींमधल्या पारंपारिक समजुतीनुसार, या घटनेमुळेच नुरुद्दीन पुढे सुफी संत म्हणून प्रिसिद्धीस आला. नुरुद्दीनच्या पूर्वायुष्याबद्दल फारसे तपशील उपलब्ध नाहीत, परंतु दिल्लीत आल्यानंतर तो प्रसिद्धीस आला आणि दिल्ली सल्तनतीचा तत्कालीन सुलतान, सुलतान इल्तुतमिश याने त्याला ‘शेख उल इस्लाम’ अशी पदवी देऊन धर्मगुरू म्हणून त्याची नेमणूक केली. दिल्लीचे लोक त्याला ‘मीर इ दिल्ली’ म्हणजे दिल्लीचा अधिपती म्हणून ओळखत असत. झियाउद्दीन बर्नी या इतिहासकारानुसार नुरुद्दीन मुबारक गझनवी, सुलतान इल्तुतमिशला भेटण्यासाठी अनेकदा जात असे आणि त्याला इस्लाम धर्माचे उपदेश देत असे. सुलतान इल्तुतमिशला उपदेश करताना नुरुद्दीन मुबारक गझनवी ची मुख्य तक्रार अशी असे की , ” दरबार पाळत असलेल्या सर्व प्रथा परंपरा या इस्लामी राजवट येण्यापूर्वी इराणमध्ये अस्तित्वात असलेल्या ससानियन राजांच्या परंपरांवर आधारीत आहेत, आणि त्या इस्लाम धर्माच्या अगदी विरुद्ध आहेत ” नुरुद्दीनच्या म्हणण्यानुसार इस्लामचे संरक्षण करायचे असल्यास सुलतानांनी चार तत्वांचे पालन केले पाहिजे . या तत्वांचे पालन केल्यास , इहलोकी कितीही पाप केले तरी या सुलतानांची गणना ‘कयामत च्या दिवशी’ संतांमध्ये आणि सतपुरुषांमध्येच होईल !

नुरुद्दीन मुबारक गझनवीने सांगितलेली ही चार तत्वे पुढील प्रमाणे:-

१) इस्लामी सत्ताधीशांनी इस्लामी प्रथापरंपरांचा पुरस्कार केला पाहिजे. इस्लामी शरिया कायद्याचे पालन करून शरिया कायद्यात जे निषिद्ध ठरवले गेले आहे ते निषिद्ध मानले पाहिजे. शरिया कायद्याचे पालन करून कुफ्र ( गैर इस्लामी धर्माचे पालन ) आणि शिर्क ( अनेकेश्वर वाद आणि मूर्तिपूजा ) यांचे समूळ उच्चटन केले पाहिजे. कुफ्र ( गैर इस्लामी धर्माचे पालन ) आणि शिर्क ( अनेकेश्वर वाद आणि मूर्तिपूजा ) यांचे समूळ उच्चटन शक्य न झाल्यास, हिंदूंचा जास्तीत जास्त अपमान कसा होईल हे त्यांनी पाहिले पाहिजे कारण हिंदू हे अल्लाहचे आणि त्याचे प्रेषित असलेल्या मुहम्मद साहेबांचे सर्वात मोठे शत्रू आहेत. डोळ्यांना होणारे हिंदूंचे दर्शन त्यांनी अजिबात सहन करता कामा नये , हिंदू दिसताच त्याला ठार मारावे. हिंदूंचे धार्मिक पुढारी असलेल्या ब्राह्मणांना विशेष करून ठार मारण्याची गरज आहे . काफिरांना ( गैरमुस्लिमांना ) आणि मुश्रिकांना ( मूर्तिपूजा करणाऱ्यांना ) सन्मानाचे आयुष्य आणि नोकरीत उच्च पदं मिळू देणे उपयोगाचे नाही.

२) पाप (इस्लामी धर्मानुसार ) आणि व्यभिचार यांना सुलतानांनी थारा देता कामा नये. इस्लामच्या शहरांमध्ये व्यभिचार करणाऱ्यांना दयामाया न दाखवता शिक्षा केली पाहिजे. वेश्यांनी त्यांचा पापी व्यवसाय सोडला नाही तर त्यांच्यावर बंधने आणून त्यांना त्यांचा धंदा गुप्त पणे करण्यास भाग पाडले पाहिजे. परंतु वेश्याव्यवसाय पूर्णपणे बंद करून चालणार नाही, कारण मग पापी लोक जनानखान्यातील मुस्लिम स्त्रियांवर बलात्कार करतील ! ( गंमत पहा , कुराणाच्या आदेशानुसार युद्धात मिळवलेल्या कितीही गैर मुस्लिम स्त्रियांना गुलाम करून त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवणे हे पाप नाही बरं का ! – कुराण सुरा ४, आयत २४ https://quran.com/4/24

३) शरिया कायद्याच्या कठोर अंमलबजावणीचे काम अल्लाह ला मानणाऱ्या आणि भिणाऱ्या, आणि शरिया कायद्याचे उत्तम ज्ञान असणाऱ्या माणसांनाच दिले पाहिजे. स्वार्थी माणसांना हे काम देऊन उपयोगाचे नाही. राज्यातून तत्वज्ञांची हकालपट्टी करून त्यांच्या शिकवणुकीवर बंदी घातली पाहिजे. सुन्नी पंथाचे कट्टर शत्रू असलेल्या शियांना दयामाया ना दाखवता, त्यांचा अपमान केला पाहिजे आणि सरकारात त्यांना नोकरी देता कामा नये.

४) (शरिया) कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे, परंतु जुलुम करणाऱ्यांमध्ये सुलतानाची दहशत असेल तरच हे शक्य होईल.

शेख अब्दुल हक्क मुहद्दीस देहलवी याने लिहिलेल्या ‘अखबार उल अखियार’ या सुफी संतांच्या फारसी चरित्रकोशात नुरुद्दीन मुबारक गझनवी बद्दलची वरील सर्व माहिती आली आहे.

सुफी संत नुरुद्दीन मुबारक गझनवी याची शिकवण – A history of Sufism in India या पुस्तकातून

झियाउद्दीन बर्नीने तारीख-ए- फिरोझशाही मध्ये केलेले वर्णन –

झियाउद्दीन बर्नी हा तेराव्या शतकातील एक मुस्लिम विचारवंत होता आणि तो दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत सुलतानाच्या जवळचा माणूस म्हणून प्रसिद्ध होता. त्याने लिहिलेले तारीख ए फिरोझशाही आणि फतवा ए जहांदरी सारखे इतिहास प्रसिद्ध आहेत. यातील तारीख ए फिरोझशाही हा फिरोझशाह तुघलकापर्यंतचा दिल्ली सल्तनतीचा इतिहास आहे. झियाउद्दीन बर्नीचा आजोबा (आईचा वडील) हुसामुद्दीन हा सुलतान घियासुद्दीन बल्बन याच्या कारकिर्दीत दरबारात वकील म्हणून कार्यरत होता.

हिंदूंना आणि विशेष करून ब्राह्मणांना दिसता क्षणी कापून काढा हा उल्लेख असलेले आदी तुर्क कालीन भारत (तारीख ए फिरोझशाहीचे हिंदी भाषांतर) मधले पान

घियासुद्दीन बल्बन हा सुरवातीला सुलतान इल्तुतमिश याचा गुलाम होता. पुढे तो दिल्ली सल्तनतीच्या गादीवर सुलतान म्हणून आला.तारीख ए फिरोझशाही या आपल्या ग्रंथात बर्नीने सुफी गुरु नुरुद्दीन मुबारक गझनवी याने सुलतान इल्तुतमिश याला केलेल्या उपदेशांच्या इतिहासाचे वर्णन केले आहे.(तारीख ए फिरोझशाही, मूळ फारसी, पृ. ४१-४४, हिंदी भाषांतर-आदी तुर्क कालीन भारत, सय्यद अतहर अब्बास रिझवी, पृ. १५३-१५५)

बर्नी लिहितो,

” सुलतान बल्बनच्या सेवेत असताना सिपहसालार हुसामुद्दीन या माझ्या आजोबांनी (आईचे वडील) बल्बनला आपल्या मुलांशी आणि विश्वासू सहकाऱ्यांशी चर्चा करताना पाहिले आहे. माझ्या आजोबांनी मला असे सांगितले की , ” आपल्या मुलांशी आणि सहकाऱ्यांशी चर्चा करताना सुलतान बल्बन म्हणत असे की मी नुरुद्दीन मुबारक गझनवी याने सुलतान इल्तुतमिशला दरबारात दिलेले उपदेश दोन वेळा ऐकले आहेत.

नुरुद्दीन सुलतान इल्तुतमिश याला म्हणत असत की , “तुम्ही ज्या प्रकारे खाता-पिता, भरजरी वस्त्र परिधान करता, राज सिंहासनापुढे लोकांना सजदा (डोकं टेकवून नमस्कार) करायला लावता हे सर्व इस्लामच्या कायद्याच्या आणि मुहम्मद पैगंबर साहेबांच्या सुन्नतीच्या विरुद्ध आहे. तुम्ही हे जे करत आहात ते इस्लामी कायद्यानुसार ‘शिर्क’ मानलं गेलं आहे आणि तुम्ही या प्रथा थांबवल्या नाहीत तर तुम्हाला कयामतीच्या दिवशी शिक्षा होईल”.

पुढे बर्नी वर नमूद केलेल्या नुरूद्दीनच्या चार तत्वांचा उल्लेख करतो (हिंदू आणि विशेष करून ब्राह्मणांना दिसता क्षणी कापून काढणे वगैरे)

सुफी संत नुरुद्दीन मुबारक गझनवी याची दिल्ली येथील दर्ग्यातील कबर

उपसंहार

शत्रूच्या कच्च्या दुव्यांना हेरून, त्या दुव्यांच्या आधारे त्यांच्यात फूट पाडून, त्यांना नामोहराम करणे हा युद्धशास्त्राचा एक महत्वाचा नियम आहे.

‘हिंदूंमधल्या खासकरून एका जातीला मारून टाका’ आणि ‘पुढे सर्व हिंदूंना देखील मारून टाका’ हा सुलतानी प्रवृत्तींचा जुनाच कार्यक्रम आहे हे इतिहासातील वरील उदाहरणावरून तुमच्या लक्षात आले असेलच. जातीवाद हा आपल्यातला कच्चा दुवा आहे आणि त्याच्याच फायदा आपले शत्रू वर्षानुवर्षे घेत आले आहेत हे जाणून, हिंदूंनी जातीवाद उभा गाडून या सुलतानी प्रवृत्ती विरुद्ध कणखरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे. तसे न करता , आज एक जात जात्यात आहे म्हणून दुसऱ्या जातींनी आनंद मानला आणि पुढे जात्यात जाण्याची पाळी आपल्यावरच आहे हे न ओळखले तर त्यासारखे दुसरे दुर्दैव ते काय !

पण दुर्दैवाने काही अज्ञानी हिंदूंना शत्रूचा हा कावा लक्षात येत नाही आणि ते अशा सुलतानी प्रवृत्तींच्या हातातले बाहुले होऊन जातात, असो.”पुण्य परउपकार पाप ते परपीडा” ही अमृतवाणी लिहिणारे जगदगुरु तुकोबाराय कुठे आणि “हिंदूंना दिसता क्षणी कापून काढा” म्हणणारा हा सुफी गुरु नुरुद्दीन मुबारक गझनवी कुठे !

बहुत काय लिहिणे, आपण सुज्ञ असा !

संदर्भ :-

१) A history of Sufism in India, Volume 1, Sayid Athar Abbas Rizvi

२) तारीख ए फ़िरोझशाही , मूळ फारसी

३) आदी तुर्क कालीन भारत सय्यद अतथर अब्बास रिझवी

लेखक :-

सत्येन सुभाष वेलणकर

Post Views: 182
Tags: islam
Previous Post

किल्ला जिंकता येत नसेल तर माझे शरीर किल्ल्यात तोफेने जाईल असे करा!!

Next Post

मौला, माऊली आणि सर्वधर्मसमभाव

Next Post
मौला, माऊली आणि सर्वधर्मसमभाव

मौला, माऊली आणि सर्वधर्मसमभाव

Comments 3

  1. Mandar Vaidya says:
    5 years ago

    Very nicely writtened. Outstanding.Fabulous.

    Reply
  2. Shivranjani says:
    5 years ago

    We have been taught biased history with only one aspect.History should be taught most objectively with fair and various perspectives. But psuedointellectuals have done this as black and white. The new generation has more wisdom. They might do correct things.

    Reply
  3. धवल रामतीर्थकर says:
    5 years ago

    ज्ञानाने डोळे उघडतात हेच खरे, असे समजू 😀

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • आम्ही कोण?
  • संपर्क
Contact us - schoolofindianhistory@gmail.com

© 2020 School of Indian History

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • भारताचा इतिहास
    • प्रागैतिहासिक भारत
    • प्राचीन भारत
    • मध्ययुगीन भारत
    • ब्रिटिशकालीन भारत
  • इंग्रजी लेख
  • संपर्क

© 2020 School of Indian History

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In