• आम्ही कोण?
  • संपर्क
Saturday, April 4, 2026
  • Login
School of Indian History
  • मुखपृष्ठ
  • भारताचा इतिहास
    • प्रागैतिहासिक भारत
    • प्राचीन भारत
    • मध्ययुगीन भारत
    • ब्रिटिशकालीन भारत
  • इंग्रजी लेख
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • भारताचा इतिहास
    • प्रागैतिहासिक भारत
    • प्राचीन भारत
    • मध्ययुगीन भारत
    • ब्रिटिशकालीन भारत
  • इंग्रजी लेख
  • संपर्क
No Result
View All Result
School of Indian History
No Result
View All Result

परचुरे वाडा व येथील ऐतिहासिक अन्नछत्र

schoolofindianhistory by schoolofindianhistory
September 27, 2020
in अपरिचित इतिहास, भारताचा इतिहास

छत्र खांबगाव हे गाव पुण्याकडून वेल्हे जाण्यासाठीच्या मार्गावर असणाऱ्या पाबे घाटात आहे. येथे सरदार परचुरे यांचा सुमारे २३० वर्षापूर्वीचा एक पंधरा खणी चौसोपी वाडा आहे.

एकूण १२० खणांची सागवानी तुळया, खांबांबर उभी राहिलेली, सुस्थितीत असलेली ही प्रचंड इमारत पाहिल्यावर मन थक्क होते. एकूण १२० खणांच्या इमारतीचे क्षेत्र साधारणपणे मागील पडीक वाडा धरून एक-दीड एकरांचे असावे. चौकोनी विटा व घडीव दगड यांनी बांधलेला हा वाडा आज दिमाखदारपणे घट्ट उभा आहे.वाड्याचे जोते घडीव दगडाचे असून, कोठेही दगडास कसलीही इजा पोहोचलेली नाही. दरवाजा आजही अगदी नवा असल्यासारखा दिसतो. दरवाजातून आत गेल्यावर मध्ये एक चौक आणि चार ती बाजूंस असलेले दुघईसोपे पाहिल्यावर हे बांधकाम आणि लाकूडकाम इतकी वर्षे कसे तग धरून राहिले याचे आश्चर्य वाटते.

परचुरे वाडा
परचुरे वाडा

समोरच्या सोप्यातून बाजूस स्वयंपाकघर आणि देवघर पाहावयास मिळते. वाड्यात शिरल्यावर दिसणारा छोटा दिवाणखाना, बैठकीत सोपा आणि तळघर पाहून वाड्याचे वैशिष्ट्य लक्षात येते. मागच्या दाराच्या पडवीच्या बाहेर गेल्यावर एक रेखीव असे तुळशीवृंदावन नजरेत भरते. आज घरी वाड्यावर बंगलोरी कौले दिसत असली तरी पूर्वी त्यावर साधी भाजकी कौले होती. त्या कौलांचा नमुना म्हणून काही कौले अजूनही परचुरे यांनी जपून ठेवली आहेत. आतील भिंतींना असलेला मातीचा गिलावा कोठेही भंग पावलेला दिसत नाही. आखीवरेखीव पद्धतीच्या अशा या वाड्याने हजारो लोकांची वर्दळ अनुभवली आहे. हा परचुरे वाडा म्हणजे पूर्वी एक अन्नछत्र होते.

त्र्यंबक नारायण परचुरे –

उत्तर पेशवाई मधील परचुरे घराण्यातील त्र्यंबक नारायण परचुरे (त्र्यंबक नारो) हे एक प्रसिद्ध पुरुष होते. भोरच्या पंत सचिवांच्या हद्दीत मौजे पुरंदरेश्वर येथे त्यांनी एक जागा खरेदी केली व तेथे असलेल्या पुरंदरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेथे धर्मशाळा, विहीर इत्यादी बांधले. श्रावण मासात कोकणातून मढे घाटातून काही ब्राह्मण मंडळी दक्षिणेसाठी पुण्यात येत असत, तसेच इतर लोकही कोकणातून येत असत. त्यांना रस्त्यात अन्न मिळावे माणून त्र्यंबक नारो यांनी खांबगाब येथे इ.स. १७८९ मध्ये आपल्या वाड्यात अन्नछत्र सुरू केले. पुढे ५० वर्षे है अन्नछत्र त्यांनी स्वखर्चाने चालवले. खर्चाची व्यवस्था सरकारातून व्हावी यासाठी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे त्यांनी विनंती केली. असनोली तालुका शहापूर, जि. ठाणे, साकुर्ली, नेरळ, मौजे गोऱ्हे (सिंहगडजवळ) या गावातून काही इनाम मिळविले.

परचुरे वाडा
परचुरे वाडा

पुढे काशी क्षेत्री जाऊन त्यांनी तेथे एक वाड़ा, एक बाग आणि एक घाट बांधला.या अन्नछत्रासंबंधीची पेशवे दफ्तरातील काही कागदपत्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यातील अन्नछत्राच्या हिशोबासंबंधीचा सालवारीने मिळालेला ताळेबंद पाहिल्यावर प्रतिवर्षी किती माणसे जेवत असत, किती माणसांना शिधा दिला, एकूण किती खर्च झाला हे पाहिल्यावर आश्चर्य वाटते. उदा. इ.स. १७९८-२३ हजार ११५ माणसे जेवली, ७ हजार ३१८ लोकांना शिधा दिला. एकूण खर्च ४ हजार ४७ आला. १८१३ साली २८ हजार ९१८ माणसे जेवली, २९५ लोकांना केवळ शिधा दिला, १ हजार ७७४ रुपये साडेसहा आणे खर्च झाला.

परचुरे वाडा

पुरंदरेश्वर महादेव –

वाड्याशेजारी परचुरे यांचे पुरंदरेश्वर महादेवाचे अतिशय सुस्थितीतील मंदिर आपले लक्ष वेधते. प्रतिवर्षी महाशिवरात्रीस तेथे उत्सव असतो. मंदिरातील महादेवाची पिंड ही घोटी पाषाणाची असून, पिंडीवर सतत अभिषेक चालू अस त्यासाठी आजही परचुरे यांनी एक पुजारी नेमला आहे. अन्नछत्रामुळे या गावास छत्रखांबगाव असे नाव पडले आहे. या गावाचे जनाई हे ग्रामदैवत आहे.

गावात आणखी काही घराणी असून, हे लहान गाव गुण्यागोविंदाने नांदत आहे. या गावातून पेटाऱ्याचा डोंगर, गुरटुंगीचा डोंगर आणि हनुमानाचा माळ पाहावयास मिळतो,२२५ वर्षापूर्वी सुरू केलेले हे अन्नछत्र म्हणजे त्या काळातील परचुरे घराण्यातील दिलदारपणा दिव्य दर्शनच होय.

परचुरे

संस्थापक त्र्यंबक नारो यांच्या पुण्याईचे फळ म्हणून आजही परचुरे घराण्यातील काही मंडळी पुण्यात विद्वतमान्य झाली आहेत. डॉ.चिं. ना. परचुरे ऊर्फ बंडोपंत हे इतिहास संशोधक ग.ह. खरे यांचे शिष्य आहे, त्यांचे बंधू सुरेशराव परचुरे यांनी अन्नछत्राच्या या वाड्याची उत्तम प्रकारे देखभाल ठेवली असून, हा अमोलिक ऐतिहासिक ठेवा दिमाखाने छत्रखांबगाव गाव येथे उभा आहे.

पूर्वी कोकणातून येणारा वाटसरु बाहेर ओसरीवरुन आत आवाज देई. अन्नशिदोरी व अन्नछत्रातील अन्न ग्रहन करी थोडी वामकुक्षी घेऊन पुढील प्रवासाला जाई. आता मुख्य रस्ता व परचुरे वाडा यात अंतर पडले आहे . रायगडाजवळही एक अन्नछत्र होते या वाड्यानंतरचा विश्राम पुढे तेथेच लोक घेत. या वाड्याला आज पुर्णावस्थेत पाहता येते. गांधीहत्येत वाड्याचं रक्षण साक्षात पुरंदरेश्वरानं केलं. छातीठोकपणे या वाड्याचं रक्षण करण्यात आले. गावातील इतक्याच दिमाखात उभं असणाऱ्या दोन वाड्यांचं संरक्षण मात्र होऊ शकलं नाही ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. पुण्याहून राजगड, तोरणा किल्ल्याकडे जाणारे भटके या पाबे घाटातच खामगाव-मावळ असणाऱ्या हिरोजी कोंडाजी फर्जंद यांच्या ऐतिहासिक वाड्यादेखील भेट देऊ शकतात.

वाडा आवार
परचुरे वाडा

संदर्भ –

१) परचुरे घराण्याचे अन्नछत्र मौजे खांबगाव- डाॕ. मधुकर रामचंद्र कुलकर्णी, अन्नछत्र आणि इतर कागदपत्रे.

लेखक –

विकास चौधरी

Post Views: 115
Tags: ऐतिहासक वास्तुऐतिहासिक वाडेभटकंती
Previous Post

रघुनाथराव पेशवे व त्यांचा कोपरजवळील हिंगणे येथील वाडा व समाधी

Next Post

पुरंदरे घराणे – पेशवाईतील एक महत्वाचे सरदार घराणे

Next Post
पुरंदरे वाडा

पुरंदरे घराणे - पेशवाईतील एक महत्वाचे सरदार घराणे

Comments 2

  1. कुणाल देशपांडे says:
    6 years ago

    चांगली माहिती, जी अजुन पर्यंत सामान्य लोकांना अज्ञात होती, ती ह्या आपल्या ऐतिहासिक लेखन उपक्रमांतुन सर्वांन पर्यंत पोहचत आहे, हे खरेच कौतुकास्पद आहे. खूप शुभेच्छा!

    Reply
  2. कुणाल देशपांडे says:
    6 years ago

    ह्या परचुरे वाड्याला नक्कीच भेट द्यायला पाहीजे. हे सर्वांन साठी खुले आहे की जाण्यापूर्वी कुणाची अनुमति घ्यावी लागते?

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • आम्ही कोण?
  • संपर्क
Contact us - schoolofindianhistory@gmail.com

© 2020 School of Indian History

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • भारताचा इतिहास
    • प्रागैतिहासिक भारत
    • प्राचीन भारत
    • मध्ययुगीन भारत
    • ब्रिटिशकालीन भारत
  • इंग्रजी लेख
  • संपर्क

© 2020 School of Indian History

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In