या लेखाद्वारे आपण भट घराण्यातील पेशव्यांच्या जन्म, पेशवे पद मिळण्याचा काळ, मृत्यू आणि समाधी अशी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेऊ.
बाळाजी विश्वनाथ पेशवे –
(यांचे मूळ चित्र उपलब्ध नाही)
जन्म :- अंदाजे सन १६६०
पेशवेपद :- विजयनाम संवत्सरे शके १६३५ मार्गशीर्ष शुक्ल १० , सोमवार दिनांक १६ नोहेंबर १७१३ रोजी छत्रपती शाहू महाराज्यांनी पुण्यातील मांजरी गावी पेशवेपदाची वस्त्रे दिली
|| श्रीराजा शाहू नरपती हर्षनिधान
बाळाजी विश्वनाथ मुख्य प्रधान ||
मृत्यू :- शार्वरीनाम संवत्सरे शके १६४२ चैत्र शुक्ल ५ , शनिवार दिनांक २ एप्रिल १७२० रोजी सासवड येथे वयाच्या ५८ व्या वर्षी झाला.
समाधी :- सासवड , तालुका पुरंदर , पुणे येथे कर्हा नदीकाठी , श्री कर्हाबाई मंदिराजवळ
बाजीराव बल्लाळ तथा थोरले बाजीराव पेशवे –

जन्म :- विक्रमनाम संवत्सर शके १६२२ भाद्रपद शुद्ध १५ , रविवार दिनांक १८ ऑगस्ट १७००
पेशवेपद :- शार्वरीनाम संवत्सरे शके १६४२ चैत्र वद्य ६ , रविवार दिनांक १७ एप्रिल १७२० रोजी छत्रपती शाहू महाराज्यांनी कर्हाडनजीक मसूर गावी पेशवेपदाची वस्त्रे दिली
|| श्रीराजा शाहू नरपती हर्षनिधान
बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान ||
मृत्यू :- रौद्रनाम संवत्सरे शके १६६२ वैशाख शुक्ल १३ , सोमवार दिनांक २८ एप्रिल १७४० रोजी मध्यप्रदेश येथील रावेरखेडी नर्मदा काठी वयाच्या ४० व्या वर्षी झाला .
समाधी :- मध्यप्रदेश येथे नर्मदा काठावर रावेरखेडी
बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे –

जन्म :- प्लवनाम संवत्सरे शके १६४३ मार्गशीर्ष वद्य १३ , बुधवार दिनांक १६ डिसेंबर १७२१
पेशवेपद :- रौद्रनाम संवत्सरे शके १६६२ आषाढ शुक्ल १२ ,बुधवार दिनांक २५ जून १७४० रोजी रोजी छत्रपती शाहू महाराज्यांनी भूईंज या गावी पेशवेपदाची वस्त्रे दिली
||श्रीराजा शाहू छत्रपती हर्षनिधान
बाळाजी बाजीराव मुख्य प्रधान ||
मृत्यू :- वृषनाम संवत्सरे शके १६८३ जेष्ठ शुक्ल ६ , मंगळवार दिनांक २३ जून १७६१ रोजी पुणे येथे पर्वतीवर वयाच्या ४० व्या वर्षी झाला .
समाधी :- मुठा नदी किनारी पुणे
माधवराव बल्लाळ तथा थोरले माधवराव पेशवे –

जन्म :- रक्ताशीनाम संवत्सरे शके १६६६ माघ वद्य ११ , शनिवार दिनांक १६ फेब्रुवारी १७४५ रोजी कर्नाटकातील सवनूर गावी झाला.
पेशवेपद :- वृषनाम संवत्सरे शके १६८३ आषाढ वद्य ३ , सोमवार दिनांक २० जुलै १७६१ रोजी छत्रपती रामराजे यांनी सातारा दरबारी पेशवेपदाची वस्त्रे दिली
||श्री राजाराम नरपति हर्षनिधान
श्री माधवराव बल्लाळमुख्य प्रधान ||
मृत्यू :- नंदनाम संवत्सरे शके १६९४ कार्तिक वद्य ८ , बुधवार दिनांक १८ नोहेंबर १७७२ रोजी पुणे येथील थेऊर येथे वयाच्या २८ व्या वर्षी झाला
समाधी :- थेऊर , मुळा नदीच्या काठावर , पुणे
नारायण बल्लाळ तथा नारायणराव पेशवे –

जन्म :- युवनाम संवत्सरे शके १६७७ श्रावण शुद्ध ४ सोमवार दिनांक 11 ऑगस्ट १७५५ रोजी पुणे येथे झाला.
पेशवेपद :- नंदनाम संवत्सरे शके १६९४ मार्गशीर्ष वद्य ३, , रविवार दिनांक १३ डिसेंबर १७७२ रोजी छत्रपती रामराजे यांनी सातारा दरबारी पेशवेपदाची वस्त्रे दिली
||श्री राजाराम नरपति हर्षनिधान
नारायण बल्लाळमुख्य प्रधान ||
मृत्यू :- विजयनाम संवत्सरे शके १६९५ भाद्रपद शुक्ल १३ , सोमवार दिनांक ३० ऑगस्ट १७७३ रोजी शनीवारवाडयात झाला.
समाधी :- मुठा नदीच्या किनारी पुणे
रघुनाथ बाजीराव तथा राघोबादादा पेशवे –

जन्म :- आनंदनाम संवत्सरे शके १६५६ श्रावण शुद्ध १३ , गुरुवार दिनांक १ ऑगस्ट १७३४ रोजी माहुली येथे झाला .
पेशवेपद :- पेशवाईचि वस्त्रे दत्तक पुत्र अमृतराव व बजाबा पुरंदरे यांनि छत्रपती रामराजे यांच्याकडून आणून दिनांक १० ओक्टोंबर १७७३ रोजी शनिवारवाड्यात दिली. २८ मे १७७४ रोजी छत्रपती रामराजे यांच्या हुकमाने पेशवे पदावरून काढण्यात आले
||श्रीसांब सुपूत्रो विजयते राजा शाहू नरपती हर्षनिधान रघुनाथ बाजीराव मुख्य प्रधान ||
मृत्यू :- शोभनाम संवत्सरे शके १७०५ मार्गर्षिश वद्य३ , गुरुवार दिनांक ११ डिसेंबर १७८३ रोजी कचेश्वर गावी झाला.
समाधी :- समाधी बांधण्यात आली नाही
माधव नारायण तथा सवाई माधवराव पेशवे –

जन्म :- जयनाम संवत्सरे शके १६९६ अधिक वैशाख शुक्ल ७ , सोमवार दिनांक १८ एप्रिल १७७४ रोजी पुरंदर किल्यावर झाला.
पेशवेपद :- जयनाम संवत्सरे शके १६९६ वैशाख वद्य ३, शनिवार दिनांक २८ मे १७७४ रोजी छत्रपती रामराजे यांच्याकडून बारभाईनी पेशवेपदाची वस्त्रे आणून पुरंदर किल्ल्यावर दिली.
||श्री राजाराम नरपति हर्षनिधान
माधवराऊ नारायण प्रधान ||
मृत्यू :- राक्षसनाम संवत्सरे शके १७१७ अश्विन शुक्ल १४ , मंगळवार दिनांक २७ ओक्टोंबर १७९५ रोजी शनीवारवाडयात झाला.
समाधी :- समाधी बांधण्यात आली नाही
बाजीराव रघुनाथ तथा दुसरे बाजीराव पेशवे –

जन्म :- जयनाम संवत्सरे शके १६९६ पौष शुक्ल ५ , शनिवार दिनांक ७ जानेवारी १७७५ रोजी मध्यप्रदेशातील धार येथे झाला
पेशवेपद :- अनलनाम संवत्सरे शके १७१८ मार्गशीर्ष शुक्ल ६ , सोमवार दिनांक ५ डिसेंबर १७९६ रोजी छत्रपती धाकटे शाहूराजे यांच्याकडून बाजीकृष्ण शेलूकर यांनी पेशवेपदाची वस्त्रे आणून दिली. ११ फेब्रुवारी १८१८ रोजी पेशवे पदावरून बडतर्फ करण्यात आले .
||श्री राजाराम नरपति हर्षनिधान
बाजीराव रघुनाथ मुख्य प्रधान ||
मृत्यू :- साधारणनाम संवत्सरे शके १७७२ पौष वद्य १२ , मंगळवार दिनांक २८ जानेवारी १८५१ रोजी उत्तरप्रदेश बिठुर येथे झाला
समाधी :- समाधी बांधण्यात आली नाही
संदर्भ – पेशवे घराण्याचा इतिहास, प्रमोद ओक
लेखक – सदर लेख नागेश सावंत यांनी लिहिलेला आहे

खूप छान माहिती दिली,
More about peshve curiocity about peshvas why they become inferor comparing with chatrapaties what is lack of qualities wheather they are not brave as compare with chatrapaties why they are not famous or not in the mounth of people they are not get people oriented
छान संकलन केले आहे. श्री प्रमोद ओक यांच्या पेशवे घराण्याचा इतिहास ह्या पुस्तकाचे सारांशच दिले आहे थोडक्यात. धन्यवाद!
पेशवे हे छत्रपतिंचे व मराठे शाहीचे एकनिष्ठ पराक्रमी व प्रामाणिक सेवक होते , स्वराज्या साठी व स्वधर्मा साठी फार मोठा त्याग केला
खुप छान माहिती आहे,
हे पुस्तक कोठे मिळेल
मी मंत्रावेगळा हि कादंबरी वाचली आपल्या दौलतीतून इंग्रजांचेराज्यात उखडून त्याग करणार्या बाजीराव पेशवे यांची ही शोकांतिका म्हणावी कि त्यांना योग्य साथ मिळाली नाही पानिपत मध्ये भाऊराव पेशवे ह्यांनी जिवाची बाजी लावली तेव्हा पण होळकरांची कुटाई केली अटकेपार झेंडे लावनार्या या वीरांगना शत शत नमन